भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून अभिवादन

मुंबई, दि. ३ : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज चैत्यभूमी दादर येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

याप्रसंगी राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, मुंबई शहर जिल्हाधिकारी संजय यादव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू भीमराव आंबेडकर, भन्ते राहुल बोधी, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर समन्वय समितीचे महासचिव नागसेन कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी सामूहिक त्रिशरण बुद्ध वंदना म्हणण्यात आली.

0000

श्रीमती शैलजा पाटील/विसंअ/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *