शहिद जवान गजानन मोरे यांना पुष्पचक्र अर्पण करुन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले अभिवादन*

सातारा दि.27 (जिमाका) : कारगिल युध्दात शहिद झालेले गजानन मोरे यांच्या अर्ध पुतळयास पुषचक्र अर्पण करुन राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा पालकमंत्री  शंभूराज देसाई  यांनी अभिवादन केले.
भुडकेवाडी ता. पाटण येथे शहिद जवान गजानन मोरे यांचा स्मृतिदिन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी,पोलीस अधीक्षक समीर शेख, प्रांताधिकारी सोपान टोणपे, तहसीलदार अनंत गुरव  , वीरमाता चतुराबाई  यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, कारगिल युध्दात शहिद झालेले गजानन मोरे यांचे बलिदान कायम स्मरणात ठेवले पाहीजे. देशाच्या रक्षणासाठी धारातीर्थी पडलेल्या शहिद गजानन मोरे यांच्या कुटुंबीयांसाठी जागा मिळण्यासाठी मी अनेक वर्षापासून प्रयत्न करत आहे. त्यांच्या जागेचा प्रस्ताव शासनाकडे त्वरित पाठवावा. विधानसभेचे आचारसंहिता लागण्यापूर्वी त्यांना जागा मिळवून देण्याचा प्रयत्न करण्यात येईल.
आपले जवान सीमांचे रक्षण करीत असल्यामुळे आपण सुरक्षीत आहोत, असेही पालकमंत्री श्री. देसाई यांनी यावेळी सांगितले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी पालकमंत्री  श्री. देसाई यांच्या हस्ते ध्वजारोहणही करण्यात आले
000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *