लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त दिल्लीतील महाराष्ट्र सदनात अभिवादन

नवी दिल्ली, दि. ०१: साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त नवी दिल्ली येथील महाराष्ट्र सदनात त्यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

यावेळी सहायक निवासी आयुक्त नितीन शेंडे व महाराष्ट्र परिचय केंद्राचे संचालक हेमराज बागुल यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. याप्रसंगी सहायक निवासी आयुक्त स्मिता शेलार, जनसंपर्क अधिकारी मनीषा पिंगळे, महाराष्ट्र सदनाचे व्यवस्थापक प्रमोद कोलपते तसेच महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्रातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान व्यवस्थापक प्रमोद कोलपते यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्य, शाहिरी आणि सामाजिक कार्याचा सविस्तर परिचय करून दिला.

००००

महाराष्ट्र परिचय केंद्र, नवी दिल्ली – वृत्तविशेष – 169/ दि.01.08.2026

एक्सवर आम्हाला फॉलो करा:

https://x.com/MahaMicHindi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *