मुंबई, दि. ०१ : लोकशाहीर साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला लोकभवन येथे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी आज पुष्पांजली वाहून अभिवादन केले. यावेळी राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, परिवार प्रबंधक डॉ. निशिकांत देशपांडे तसेच लोकभवनातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
००००
जसंअ/लोकभवन