लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना विधान भवनात आदरांजली

मुंबई, दि. ०१ : लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त महाराष्ट्र विधानपरिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांनी विधान भवनातील त्यांच्या अर्धाकृती पुतळयास पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहिली.

याप्रसंगी महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे सचिव जितेंद्र भोळे, सचिव शिवदर्शन साठ्ये, उपसचिव विजय कोमटवार, वि.स.पागे, संसदीय प्रशिक्षण केंद्रांचे संचालक आणि जनसंपर्क अधिकारी निलेश मदाने यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही लोकमान्य टिळक यांच्या अर्धाकृती पुतळ्यास गुलाबपुष्प अर्पण करुन आदरांजली वाहिली.

0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *