मुंबई, दि. 29 :- “आयसीसी टी-ट्वेंटी विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाचे कौतुक करायला शब्द अपुरे आहेत. तब्बल सतरा वर्षांनंतर भारतीय क्रिकेट संघाने टी-ट्वेंटी वर्ल्डकप जिंकून देशवासियांना दिलेला आनंद अवर्णनीय आहे. संपूर्ण देश या विजयाने भारावून गेला आहे. कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने केलेली कामगिरी जगज्जेत्यासारखीच आहे. विराट कोहली, अक्षर पटेल, शिवम दुबे यांनी दमदार पण संयमी खेळी करुन सर्वाधिक धावांचा विक्रम रचला. सूर्यकुमार यादवचा झेल, जसप्रीत बुमराहची गोलंदाजी हे सारंच अविस्मरणीय होतं. संघातल्या प्रत्येक खेळाडूचं योगदान, समस्त देशवासियांच्या शुभेच्छांमुळेच हे यश मिळालं आहे. भारतीय क्रिकेट संघाचं हे यश देशातील क्रिकेटसह देशातील अन्य खेळांना संजीवनी तसेच खेळाडूंना प्रेरणा देईल. आयसीसी टी-ट्वेंटी विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचे मी मनापासून अभिनंदन करतो,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनी विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघाचे अभिनंदन केले आहे.
Related Posts
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुलींच्या नूतन वसतिगृहाचे उद्घाटन
अहिल्यानगर दि. ६ : पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे-पाटील फाऊंडेशनचे वैद्यकीय महाविद्यालय व हॉस्पीटलच्या ‘सिंधू’ वसतीगृहाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या…
नदीजोड प्रकल्प पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारने अर्थसहाय्य करावे – महाराष्ट्राची मागणी
नवी दिल्ली, दि.१९ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याकरिता राज्य सरकारने सुरु केलेल्या नदीजोड प्रकल्पाच्या पूर्णत्वासाठी केंद्र…
खरीप हंगामात शेतकऱ्यांसाठी सूक्ष्म नियोजन करा – पालकमंत्री डॉ. अशोक उईके
खरीप हंगाम पूर्व आढावा बैठक चंद्रपूर, दि. 10 मे : खरीप हंगाम हा शेतकऱ्यांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असतो. या हंगामावरच शेतकऱ्यांच्या…