मुंबई, दि. 29 :- “आयसीसी टी-ट्वेंटी विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाचे कौतुक करायला शब्द अपुरे आहेत. तब्बल सतरा वर्षांनंतर भारतीय क्रिकेट संघाने टी-ट्वेंटी वर्ल्डकप जिंकून देशवासियांना दिलेला आनंद अवर्णनीय आहे. संपूर्ण देश या विजयाने भारावून गेला आहे. कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने केलेली कामगिरी जगज्जेत्यासारखीच आहे. विराट कोहली, अक्षर पटेल, शिवम दुबे यांनी दमदार पण संयमी खेळी करुन सर्वाधिक धावांचा विक्रम रचला. सूर्यकुमार यादवचा झेल, जसप्रीत बुमराहची गोलंदाजी हे सारंच अविस्मरणीय होतं. संघातल्या प्रत्येक खेळाडूचं योगदान, समस्त देशवासियांच्या शुभेच्छांमुळेच हे यश मिळालं आहे. भारतीय क्रिकेट संघाचं हे यश देशातील क्रिकेटसह देशातील अन्य खेळांना संजीवनी तसेच खेळाडूंना प्रेरणा देईल. आयसीसी टी-ट्वेंटी विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचे मी मनापासून अभिनंदन करतो,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनी विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघाचे अभिनंदन केले आहे.
Related Posts
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या शतकोत्तर सुवर्णजयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून कृतज्ञतापूर्वक अभिवादन
मुंबई, दि. २५ :- सामाजिक न्यायाच्या संकल्पनेचे जनक, रयतेचे राजे, लोकराजे, राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या शतकोत्तर सुवर्णजयंती निमित्त उपमुख्यमंत्री अजित…
पत्रकारांसाठी ‘एआय’चे प्रशिक्षण कौशल्यवर्धनाचा नाविन्यपूर्ण उपक्रम – मंत्री मंगलप्रभात लोढा
मुंबई, दि १३ : जगभरात आता विविध क्षेत्रात ‘एआय’ तंत्रज्ञानाच्या माध्यमाने क्रांती घडत असून प्रसिद्धी माध्यमातही याचा मोठ्या प्रमाणात वापर…
म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष यू मीन आँग ह्लाइंग यांचे शिष्टमंडळासह मुंबईत आगमन
मुंबई, दि. २: म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष यू मीन आँग ह्लाइंग व त्यांच्या शिष्टमंडळाचे येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज सकाळी…