मुंबई, दि. 29 :- “आयसीसी टी-ट्वेंटी विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाचे कौतुक करायला शब्द अपुरे आहेत. तब्बल सतरा वर्षांनंतर भारतीय क्रिकेट संघाने टी-ट्वेंटी वर्ल्डकप जिंकून देशवासियांना दिलेला आनंद अवर्णनीय आहे. संपूर्ण देश या विजयाने भारावून गेला आहे. कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने केलेली कामगिरी जगज्जेत्यासारखीच आहे. विराट कोहली, अक्षर पटेल, शिवम दुबे यांनी दमदार पण संयमी खेळी करुन सर्वाधिक धावांचा विक्रम रचला. सूर्यकुमार यादवचा झेल, जसप्रीत बुमराहची गोलंदाजी हे सारंच अविस्मरणीय होतं. संघातल्या प्रत्येक खेळाडूचं योगदान, समस्त देशवासियांच्या शुभेच्छांमुळेच हे यश मिळालं आहे. भारतीय क्रिकेट संघाचं हे यश देशातील क्रिकेटसह देशातील अन्य खेळांना संजीवनी तसेच खेळाडूंना प्रेरणा देईल. आयसीसी टी-ट्वेंटी विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचे मी मनापासून अभिनंदन करतो,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनी विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघाचे अभिनंदन केले आहे.
Related Posts
सांगली जिल्ह्यात २४ लाखांहून अधिक मतदार बजावणार मतदानाचा हक्क
सांगली, दि. १९ (जिमाका) : जिल्ह्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी येत्या 7 मे 2024 रोजी मतदान होत असून जिल्ह्यात लोकसभेसाठी 24 लाख 36 हजार 820 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये 12 लाख 43 हजार 397 इतके पुरुष…
छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा तिथीनुसार
मुंबई, दि.२९ छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा दरवर्षी तिथीनुसार करण्याची घोषणा रायगड येथे आयोजित कार्यक्रमात करण्यात आली आहे. शासनाकडून…
‘सचेत’ प्रणाली- आपत्ती काळातील ‘संदेशदुत’
सिंधुदुर्गनगरी, दि.11 (जि.मा.का): आपत्ती व्यवस्थापन म्हणजे नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपत्तींच्या वेळी जीवन आणि मालमत्तेचे संरक्षण करणे होय. नैसर्गिक आपत्ती, पूर, चक्रीवादळ, भूकंप, रोगाचा प्रादुर्भाव आणि दुष्काळ…