पु. ल. कट्ट्यावर ७ ऑगस्टला विजयाबाईंच्या आठवणींचा जागर

मुंबई, दि. ४ : ज्येष्ठ दिग्दर्शिका, नाट्यगुरू विजया मेहता यांच्या आठवणींचा जागर शुक्रवार, ७ ऑगस्ट २०२६ रोजी सायं. ६:३० वाजता पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या पु.ल. कट्ट्यावर करण्यात येणार आहे. विजया बाईंनी लिहिलेल्या काही आठवणी, त्यांच्याविषयीच्या दिग्गजांच्या मुलाखती, लेख यांचे अभिवाचन  शुभांगी भुजबळ, अक्षय शिंपी, पल्लवी वाघ-केळकर सादर करणार आहेत. कार्यक्रमात ज्येष्ठ रंगकर्मी प्रतिमा कुलकर्णी यांची विशेष उपस्थिती लाभणार असून त्याही यावेळी विजया बाईंच्या आठवणींना उजाळा देणार आहेत.

अकादमीच्या चौथ्या मजल्यावरील बहुविध दालन येथे आयोजित या कार्यक्रमाला रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन अकादमीकडून करण्यात येत आहे.

0000

संजय ओरके/विसंअ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *