मुंबई, दि. 29 :- “आयसीसी टी-ट्वेंटी विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाचे कौतुक करायला शब्द अपुरे आहेत. तब्बल सतरा वर्षांनंतर भारतीय क्रिकेट संघाने टी-ट्वेंटी वर्ल्डकप जिंकून देशवासियांना दिलेला आनंद अवर्णनीय आहे. संपूर्ण देश या विजयाने भारावून गेला आहे. कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने केलेली कामगिरी जगज्जेत्यासारखीच आहे. विराट कोहली, अक्षर पटेल, शिवम दुबे यांनी दमदार पण संयमी खेळी करुन सर्वाधिक धावांचा विक्रम रचला. सूर्यकुमार यादवचा झेल, जसप्रीत बुमराहची गोलंदाजी हे सारंच अविस्मरणीय होतं. संघातल्या प्रत्येक खेळाडूचं योगदान, समस्त देशवासियांच्या शुभेच्छांमुळेच हे यश मिळालं आहे. भारतीय क्रिकेट संघाचं हे यश देशातील क्रिकेटसह देशातील अन्य खेळांना संजीवनी तसेच खेळाडूंना प्रेरणा देईल. आयसीसी टी-ट्वेंटी विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचे मी मनापासून अभिनंदन करतो,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनी विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघाचे अभिनंदन केले आहे.
Related Posts
राज्य शासनातर्फे यावर्षीपासून आंतरराष्ट्रीय दर्जाचा मराठी चित्रपट महोत्सव
साठाव्या राज्य मराठी चित्रपट पुरस्काराच्या प्राथमिक फेरीची नामांकने घोषित तांत्रिक आणि बालकलाकार विभागातले पुरस्कार जाहीर मुंबई दि. २७ : मराठी…
‘म्हाडा’च्या माध्यमातून दोन वर्षात सुमारे एक लाख घरे उभारणार – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई, दि. २९ :- सर्वसामान्यांच्या गृहस्वप्नपूर्तीसाठी राज्य शासन कटिबद्ध असून येत्या दोन वर्षात म्हाडाच्या माध्यमातून सुमारे एक लाख घरांच्या उभारणीस…
मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विधान भवन येथे “जावे विनोदाच्या गावा” विशेष कार्यक्रम
श्रेष्ठ लेखकांच्या साहित्यकृतींचे अभिवाचन “लोकसेवेचा लोकजागर” ग्रंथाचे प्रकाशन मुंबई, दि. २६ : महाराष्ट्र विधानमंडळातील मध्यवर्ती सभागृहात यंदाच्या मराठी भाषा गौरव…