मुंबई, दि. 29 :- “आयसीसी टी-ट्वेंटी विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाचे कौतुक करायला शब्द अपुरे आहेत. तब्बल सतरा वर्षांनंतर भारतीय क्रिकेट संघाने टी-ट्वेंटी वर्ल्डकप जिंकून देशवासियांना दिलेला आनंद अवर्णनीय आहे. संपूर्ण देश या विजयाने भारावून गेला आहे. कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने केलेली कामगिरी जगज्जेत्यासारखीच आहे. विराट कोहली, अक्षर पटेल, शिवम दुबे यांनी दमदार पण संयमी खेळी करुन सर्वाधिक धावांचा विक्रम रचला. सूर्यकुमार यादवचा झेल, जसप्रीत बुमराहची गोलंदाजी हे सारंच अविस्मरणीय होतं. संघातल्या प्रत्येक खेळाडूचं योगदान, समस्त देशवासियांच्या शुभेच्छांमुळेच हे यश मिळालं आहे. भारतीय क्रिकेट संघाचं हे यश देशातील क्रिकेटसह देशातील अन्य खेळांना संजीवनी तसेच खेळाडूंना प्रेरणा देईल. आयसीसी टी-ट्वेंटी विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचे मी मनापासून अभिनंदन करतो,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनी विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघाचे अभिनंदन केले आहे.
Related Posts
आदिवासी विकास मंत्री प्रा.डॉ.अशोक वुईके यांच्या उपस्थितीत सेवा हक्क दिनानिमित्त शपथ
यवतमाळ, दि. २८: लोकसेवा हक्क अधिनियमाची दशकपूर्ती व सेवा हक्क दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवन येथे शपथ कार्यक्रमात आदिवासी विकास…
छत्रपती संभाजीनगर कारागृहाला प्रधान सचिव राधिका रस्तोगी यांची भेट
छत्रपती संभाजीनगर,दि.२८(जिमाका)- गृह विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती राधिका रस्तोगी यांनी छत्रपती संभाजीनगर मध्यवर्ती कारागृहाला गुरुवारी (दि.२७) भेट दिली. या वेळी विशेष…
सर्व वित्तीय निकष पाळूनच निधीची तरतूद; नवीन उत्पन्न स्त्रोत निर्माण करण्यावर राज्य शासनाचा भर – उपमुख्यमंत्री अजित पवार
नागपूर, दि. 11 :- खर्चावर कठोर नियंत्रण, काटेकोर आर्थिक शिस्त, संसाधनांचा जास्तीत जास्त वापर आणि नवीन उत्पन्न स्त्रोत निर्माण करण्यावर राज्य शासनाचा भर…