मुंबई, दि. 29 :- “आयसीसी टी-ट्वेंटी विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाचे कौतुक करायला शब्द अपुरे आहेत. तब्बल सतरा वर्षांनंतर भारतीय क्रिकेट संघाने टी-ट्वेंटी वर्ल्डकप जिंकून देशवासियांना दिलेला आनंद अवर्णनीय आहे. संपूर्ण देश या विजयाने भारावून गेला आहे. कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने केलेली कामगिरी जगज्जेत्यासारखीच आहे. विराट कोहली, अक्षर पटेल, शिवम दुबे यांनी दमदार पण संयमी खेळी करुन सर्वाधिक धावांचा विक्रम रचला. सूर्यकुमार यादवचा झेल, जसप्रीत बुमराहची गोलंदाजी हे सारंच अविस्मरणीय होतं. संघातल्या प्रत्येक खेळाडूचं योगदान, समस्त देशवासियांच्या शुभेच्छांमुळेच हे यश मिळालं आहे. भारतीय क्रिकेट संघाचं हे यश देशातील क्रिकेटसह देशातील अन्य खेळांना संजीवनी तसेच खेळाडूंना प्रेरणा देईल. आयसीसी टी-ट्वेंटी विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचे मी मनापासून अभिनंदन करतो,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनी विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघाचे अभिनंदन केले आहे.
Related Posts
विधानसभा प्रश्नोत्तरे
ड्रग्ज प्रकरणात दोषी आढळणाऱ्यांविरोधात कडक कारवाई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई, दि.२४ :- राज्य शासनाने ड्रग्ज रॅकेटविरुद्ध कठोर भूमिका घेतली असून ड्रग्ज प्रकरणात…
पुस्तकांच्या माध्यमातून वाचनसंस्कृतीला चालना मिळावी – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
नागपूर, दि. २२ : झपाट्याने बदलत असलेल्या जगात ज्ञान आणि तंत्रज्ञानासोबतच समृद्ध विचारही महत्त्वाचे आहेत. या साऱ्यांचे स्त्रोत पुस्तके आहेत.…
जल प्रवासी वाहतुकीसाठी वॉटर मेट्रो प्रकल्प तीन टप्प्यात कार्यान्वित करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि.१७ : “मुंबई महानगर प्रदेशात जल प्रवासी वाहतुकीसाठी वॉटर मेट्रो प्रकल्प तीन टप्प्यात कार्यान्वित करण्यात येणार असून यादृष्टीने शिपयार्ड…