मुंबई, दि. 29 :- “आयसीसी टी-ट्वेंटी विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाचे कौतुक करायला शब्द अपुरे आहेत. तब्बल सतरा वर्षांनंतर भारतीय क्रिकेट संघाने टी-ट्वेंटी वर्ल्डकप जिंकून देशवासियांना दिलेला आनंद अवर्णनीय आहे. संपूर्ण देश या विजयाने भारावून गेला आहे. कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने केलेली कामगिरी जगज्जेत्यासारखीच आहे. विराट कोहली, अक्षर पटेल, शिवम दुबे यांनी दमदार पण संयमी खेळी करुन सर्वाधिक धावांचा विक्रम रचला. सूर्यकुमार यादवचा झेल, जसप्रीत बुमराहची गोलंदाजी हे सारंच अविस्मरणीय होतं. संघातल्या प्रत्येक खेळाडूचं योगदान, समस्त देशवासियांच्या शुभेच्छांमुळेच हे यश मिळालं आहे. भारतीय क्रिकेट संघाचं हे यश देशातील क्रिकेटसह देशातील अन्य खेळांना संजीवनी तसेच खेळाडूंना प्रेरणा देईल. आयसीसी टी-ट्वेंटी विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचे मी मनापासून अभिनंदन करतो,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनी विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघाचे अभिनंदन केले आहे.
Related Posts
कोल्हापुरात १० हजार विद्यार्थ्यांच्या सहभागातून होणार मतदार जनजागृती
कोल्हापूर, दि. 18 (जिमाका): सार्वत्रिक लोकसभा निवडणूक सन 2024 साठी जास्तीत जास्त मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा यासाठी जनजागृती करुन मतदानाची…
रायगड जिल्हा, पुणे घाट भागात रेड अलर्ट तर सहा जिल्ह्यांसह नाशिक, सातारा, कोल्हापूर घाट परिसरात ऑरेंज अलर्ट
कोकण किनारपट्टीला उंच लाटांचा इशारा; मच्छिमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना मुंबई, दि. २० : भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्र…
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या कामाची – पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केली पाहणी
सातारा दि. 19 : छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या कामाची पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केली पहाणी. यावेळी…