मुंबई, दि. 29 :- “आयसीसी टी-ट्वेंटी विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाचे कौतुक करायला शब्द अपुरे आहेत. तब्बल सतरा वर्षांनंतर भारतीय क्रिकेट संघाने टी-ट्वेंटी वर्ल्डकप जिंकून देशवासियांना दिलेला आनंद अवर्णनीय आहे. संपूर्ण देश या विजयाने भारावून गेला आहे. कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने केलेली कामगिरी जगज्जेत्यासारखीच आहे. विराट कोहली, अक्षर पटेल, शिवम दुबे यांनी दमदार पण संयमी खेळी करुन सर्वाधिक धावांचा विक्रम रचला. सूर्यकुमार यादवचा झेल, जसप्रीत बुमराहची गोलंदाजी हे सारंच अविस्मरणीय होतं. संघातल्या प्रत्येक खेळाडूचं योगदान, समस्त देशवासियांच्या शुभेच्छांमुळेच हे यश मिळालं आहे. भारतीय क्रिकेट संघाचं हे यश देशातील क्रिकेटसह देशातील अन्य खेळांना संजीवनी तसेच खेळाडूंना प्रेरणा देईल. आयसीसी टी-ट्वेंटी विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचे मी मनापासून अभिनंदन करतो,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनी विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघाचे अभिनंदन केले आहे.
Related Posts
राज्यात ‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद
मुंबई, दि. ७ : राज्यात १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ या काळात राबविण्यात आलेल्या ‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ या…
आरोग्य यंत्रणेच्या बळकटीसाठी निधीचे योग्य नियोजन करा – राज्यमंत्री मेघना साकोरे – बोर्डीकर
मुंबई, दि.२२ : आरोग्य यंत्रणेच्या बळकटीसाठी निधीचे योग्य नियोजन करण्याचे निर्देश आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी दिले. सन 2025-26 या…
मालवणमधील राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या कामाला गती
दुर्घटनेची जबाबदारी निश्चित करण्यासाठी तसेच नवीन पुतळा उभारण्यासाठी समित्या गठित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतल्या निरनिराळ्या मूर्तिकारांशी भेटीगाठी मुंबई :-…