मुंबई, दि. 29 :- “आयसीसी टी-ट्वेंटी विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाचे कौतुक करायला शब्द अपुरे आहेत. तब्बल सतरा वर्षांनंतर भारतीय क्रिकेट संघाने टी-ट्वेंटी वर्ल्डकप जिंकून देशवासियांना दिलेला आनंद अवर्णनीय आहे. संपूर्ण देश या विजयाने भारावून गेला आहे. कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने केलेली कामगिरी जगज्जेत्यासारखीच आहे. विराट कोहली, अक्षर पटेल, शिवम दुबे यांनी दमदार पण संयमी खेळी करुन सर्वाधिक धावांचा विक्रम रचला. सूर्यकुमार यादवचा झेल, जसप्रीत बुमराहची गोलंदाजी हे सारंच अविस्मरणीय होतं. संघातल्या प्रत्येक खेळाडूचं योगदान, समस्त देशवासियांच्या शुभेच्छांमुळेच हे यश मिळालं आहे. भारतीय क्रिकेट संघाचं हे यश देशातील क्रिकेटसह देशातील अन्य खेळांना संजीवनी तसेच खेळाडूंना प्रेरणा देईल. आयसीसी टी-ट्वेंटी विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचे मी मनापासून अभिनंदन करतो,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनी विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघाचे अभिनंदन केले आहे.
Related Posts
‘लाडकी बहीण’ योजनेतील लाभार्थ्यांनी केवायसी करण्याचे राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांचे आवाहन
मुंबई, दि. १९ : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील सर्व लाभार्थ्यांना मिळणारे हप्ते अधिक सुलभ, सुकर व पारदर्शक व्हावेत यासाठी केवायसी…
कुवैतच्या आगीत मृत्युमुखी पडलेल्या ४५ भारतीयांचे मृतदेह देशात पोहोचले
नवी दिल्ली, 14: कुवैतच्या दक्षिण मंगफ परिसरातील इमारतीला काही दिवसांपूर्वी लागलेल्या भीषण आगीत 45 भारतीयांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, या…
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करमाळा विधानसभा मतदासंघातील विविध विकास कामांचा शुभारंभ
सोलापूर, दिनांक 24(जिमाका)- राज्य शासनाने करमाळा विधानसभा मतदारसंघातील विविध विकास कामांसाठी भरघोस निधी मंजूर केलेला आहे. यामध्ये सोलापूर जिल्हा एकात्मिक…