मुंबई दि.२७ : – महावितरणने महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या (MERC) मान्यतेनंतर ऊर्जा मंत्रालय (MoP), भारत सरकारच्या (GoI) सुधारित वितरण क्षेत्र योजनेमध्ये (RDSS) वाहिन्यांचे विलगीकरण, वितरण हानी कमी करणे, वितरण प्रणालीचे सक्षमीकरण आणि स्मार्ट मीटरिंग (Smart Metering) यांसारखे कार्यक्रम हाती घेतले आहेत. यामुळे महाराष्ट्रातील ग्राहकांना विश्वासार्ह आणि दर्जेदार वीजपुरवठा होण्यास मदत होईल. या योजनेद्वारे सिस्टीम मीटरिंग अंतर्गत सबस्टेशनमधील सर्व फीडरवर तसेच वितरण रोहित्रांवर (Distribution Transformer) आणि सर्व सरकारी कार्यालयांमध्ये स्मार्ट मीटर बसविण्यात येत आहेत. सर्वसामान्य ग्राहकांना मात्र प्रीपेड स्मार्ट मीटर बसविण्यात येत नाहीत असे महावितरणने कळविले आहे.
Related Posts
शासकीय योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ‘संवाद वारी’ हा उपक्रम महत्त्वाचा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे शासकीय योजनांच्या प्रचार प्रसिद्धीचे काम चांगले सोलापूर, दि. १६ (जिमाका) : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्यावतीने शासकीय…
विधानसभा निवडणूक २०२४ मध्ये मतदात्यांचा वाढता टक्का; करवीर मतदारसंघात सर्वाधिक मतदान
मुंबई, दि. २२: महाराष्ट्रात १५ ऑक्टोबर २०२४ रोजी आदर्श आचारसंहिता लागू होऊन २० नोव्हेंबर २०२४ रोजी महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक…
विधानपरिषद मुंबई शिक्षक व पदवीधर मतदारसंघ निवडणूक २०२४: मतदानाच्या दिवशी मतदारांना विशेष नैमित्तिक रजा जाहीर
मुंबई, दि. 20 :- लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५१ च्या कलम १३५-ब नुसार लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या मतदानाच्या दिवशी कर्मचाऱ्यांना भरपगारी रजा…