मुंबई दि.२७ : – महावितरणने महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या (MERC) मान्यतेनंतर ऊर्जा मंत्रालय (MoP), भारत सरकारच्या (GoI) सुधारित वितरण क्षेत्र योजनेमध्ये (RDSS) वाहिन्यांचे विलगीकरण, वितरण हानी कमी करणे, वितरण प्रणालीचे सक्षमीकरण आणि स्मार्ट मीटरिंग (Smart Metering) यांसारखे कार्यक्रम हाती घेतले आहेत. यामुळे महाराष्ट्रातील ग्राहकांना विश्वासार्ह आणि दर्जेदार वीजपुरवठा होण्यास मदत होईल. या योजनेद्वारे सिस्टीम मीटरिंग अंतर्गत सबस्टेशनमधील सर्व फीडरवर तसेच वितरण रोहित्रांवर (Distribution Transformer) आणि सर्व सरकारी कार्यालयांमध्ये स्मार्ट मीटर बसविण्यात येत आहेत. सर्वसामान्य ग्राहकांना मात्र प्रीपेड स्मार्ट मीटर बसविण्यात येत नाहीत असे महावितरणने कळविले आहे.
Related Posts
राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्राप्त कलाशिक्षक सागर बगाडे यांची ‘दिलखुलास’ कार्यक्रमात मुलाखत
मुंबई, दि.4 : राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्राप्त कलाशिक्षक सागर बगाडे यांची मुलाखत माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मिती ‘दिलखुलास’ कार्यक्रमात प्रसारित…
राजधानीत महात्मा ज्योतिराव फुले यांना जयंतीनिमित्त अभिवादन
नवी दिल्ली, दि. ११ : थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त आज राजधानीत त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. महाराष्ट्र…
मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी पदभार स्वीकारला
मुंबई, दि. ०१: मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी मंत्रालयातील दालनात त्यांच्या विभागाचा पदभार स्वीकारला. यावेळी त्यांनी विभागाच्या कामकाजाचा सविस्तर…