मुंबई दि.२७ : – महावितरणने महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या (MERC) मान्यतेनंतर ऊर्जा मंत्रालय (MoP), भारत सरकारच्या (GoI) सुधारित वितरण क्षेत्र योजनेमध्ये (RDSS) वाहिन्यांचे विलगीकरण, वितरण हानी कमी करणे, वितरण प्रणालीचे सक्षमीकरण आणि स्मार्ट मीटरिंग (Smart Metering) यांसारखे कार्यक्रम हाती घेतले आहेत. यामुळे महाराष्ट्रातील ग्राहकांना विश्वासार्ह आणि दर्जेदार वीजपुरवठा होण्यास मदत होईल. या योजनेद्वारे सिस्टीम मीटरिंग अंतर्गत सबस्टेशनमधील सर्व फीडरवर तसेच वितरण रोहित्रांवर (Distribution Transformer) आणि सर्व सरकारी कार्यालयांमध्ये स्मार्ट मीटर बसविण्यात येत आहेत. सर्वसामान्य ग्राहकांना मात्र प्रीपेड स्मार्ट मीटर बसविण्यात येत नाहीत असे महावितरणने कळविले आहे.
Related Posts
शेतकऱ्यांना त्रास होईल असा प्रकल्प जिल्ह्यात येणार नाही – पालकमंत्री उदय सामंत
रायगड जिमाका दि 7–रायगड जिल्ह्याचा औद्योगिक दृष्टीने तसेच सर्वांगीण विकास करतांना शेतकऱ्यांना त्रास होईल असा कुठलाही प्रकल्प रायगड जिल्ह्यात येणार…
राज्यात रहिवासी क्षेत्रासाठी तुकडेबंदी कायदा रद्द – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे
राज्यातील ४९ लाख तुकड्यांचे व्यवहार नियमित होणार नियमितीकरणासाठी कोणतेही शुल्क नाही शहरी व प्रादेशिक योजनांमधील बिगर शेती वापर क्षेत्रांना लाभ…
राष्ट्रनेत्याच्या जन्मदिनापासून राष्ट्रपित्याच्या जयंतीपर्यंत ‘सेवा पंधरवडा’
महसूल विभाग हा जनतेच्या दैनंदिन समस्या आणि जिव्हाळ्याच्या विषयांशी निगडीत असल्याने सामान्य जनतेचे जीवनमान उंचावण्यासाठी महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम,…