नागपूर ,दि. ४: यशवंत पंचायतराज अभियानात राज्यस्तरीय व विभागीय पुरस्कार विजेत्या पंचायत समिती आणि संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात सरस ठरलेल्या विभागातील ग्राम पंचायतींना आज ५ फेब्रुवारी रोजी विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे.
पुरस्कार वितरण सोहळा वंसतराव नाईक राज्य कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था (वनामती) येथे सकाळी ११ वाजता होणार आहे. यशवंत पंचायतराज अभियान पुरस्कारांतर्गत नागपूर विभागातील वर्ष २०२०-२१ आणि वर्ष २०२२-२३ च्या पुरस्कारांत राज्यस्तरावर व विभागात उत्तम ठरलेल्या पंचायत समितिंना गौरविण्यात येणार आहे.
स्वच्छ भारत अभियान (ग्रामीण) अंतर्गत राज्यातील ग्रामीण भागात संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे.या अभियानांतर्गत विविध श्रेणीमध्ये सरसर कामगिरी करणाऱ्या नागपूर विभागातील ग्राम पंचायतींना वर्ष २०२०-२१ व २०२१-२२ (एकत्रित पुरस्कार) आणि वर्ष २०१९-२०च्या पुरस्कार वितरित करण्यात येणार आहे.
०००००