कुणबी जात प्रमाणपत्राच्या वितरणासाठी ३० व ३१ जानेवारी रोजी विशेष शिबिराचे आयोजन

मुंबई, दि. २५ : मुंबई शहर जिल्ह्याच्या विविध शासकीय, निमशासकीय कार्यालयांमध्ये आढळून आलेल्या कुणबी, मराठा- कुणबी, कुणबी- मराठा प्रवर्गाच्या अभिलेख्यांची व्यक्तीनिहाय यादी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या यादीमध्ये समाविष्ट व्यक्ती तसेच आवश्यक पुरावे सादर करणारे अर्जदार नियमानुसार पात्र ठरत असल्यास, अशा व्यक्तींचे जात प्रमाणपत्र संदर्भातील अर्ज भरुन घेणे, ते स्वीकारण्यासाठी ३० व ३१ जानेवारी २०२४ रोजी सकाळी ११.३० ते दुपारी ४.३० या कालावधीत विशेष शिबिर होणार आहे, असे मुंबई शहरचे उपजिल्हाधिकारी कल्याण पांढरे (सा. प्र.) यांनी प्रसिद्धीस दिलेल्या  पत्रकान्वये कळविले आहे.

हे शिबिर जिल्हास्तरीय आपले सरकार सेवा केंद्र, जिल्हाधिकारी कार्यालयाचे आवार, ओल्ड कस्टम हाऊस, शहीद भगतसिंग मार्ग, फोर्ट, मुंबई येथे तसेच नागरिकांच्या सोयीसाठी मुंबई शहर जिल्ह्यातील एकूण ९ वॉर्डमधील बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वॉर्ड ऑफिसमध्ये स्थापन करण्यात आलेल्या विशेष कक्षात होईल.

मा. न्यायमूर्ती शिंदे समिती (निवृत्त) यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या समितीने विविध जिल्ह्यांत आढळून आलेल्या कुणबी नोंदीसंदर्भात संबंधित पात्र व्यक्तींना कुणबी जात प्रमाणपत्र तत्काळ निर्गमित करणे आवश्यक असल्याचे राज्य शासनाने १८ जानेवारी २०२४ रोजीच्या पत्रान्वये कळविले आहे. त्यानुसार कुणबी, मराठा- कुणबी, कुणबी- मराठा जातीसंदर्भात आढळून आलेल्या नोंदींच्या आधारे संबंधित पात्र व्यक्तींना कुणबी, मराठा- कुणबी, कुणबी- मराठा जात प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यासाठी या शिबिरांचे आयोजन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

मुंबई शहर जिल्ह्यातील कुणबी, मराठा- कुणबी, कुणबी- मराठा या प्रवर्गातील नागरिकांनी आपल्याकडील उपलब्ध पुराव्यांसह शिबिरांच्या ठिकाणी उपस्थित राहून सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी, मुंबई शहर यांनी केले आहे.

विशेष कक्ष स्थापन केलेल्या ठिकाणांची यादी व संपर्क क्रमांक असे (अनुक्रमे कार्यालयाचे नाव/बृहन्मुंबई वॉर्ड, पत्ता, आपले सरकार केंद्र चालकाचे नाव, मोबाईल क्रमांक या क्रमाने) : जिल्हाधिकारी कार्यालय, मुंबई शहर, तळमजला, ओल्ड कस्टम हाऊस, शहीद भगतसिंग मार्ग, फोर्ट, मुंबई, नीलेश बापूसाहेब माने- देशमुख, ९७६९२४१३१४. ‘ए’ वॉर्ड, १३४ ई, शहीद भगतसिंग मार्ग, रिझर्व्ह बँकेजवळ, फोर्ट, मुंबई, प्रभू हिरा राठोड, ९७६८०५७१८०. ‘बी’ वॉर्ड, १२१, रामचंद्र भट मार्ग, सर ज. जी. रुग्णालयासमोर, मुंबई, सुधीर रमाकांत चिंबूलकर, ९००४३५२१३४. ‘सी’ वॉर्ड, ७६, श्रीकांत पालेकर मार्ग, चंदनवाडी स्मशानभूमीजवळ, मुंबई, महेश नथुराम साळवी, ९८७०८७७५३३. ‘डी’ वॉर्ड, जोबनपुत्र कम्पाऊंड, नाना चौक, मुंबई, ऋग्वेद रवींद्र खांडेकर (९९६७०२१५२२), प्रथमेश प्रकाश राऊत (९८९२००२१७०). ‘ई’ वॉर्ड, १०, शेख हफिजुद्दीन मार्ग, भायखळा, मुंबई, यश एन्टरप्रायजेस (९७०२२८९७६४), परवेझ अहमद अन्सारी (९८२१३८७९१८). ‘एफ’ नॉर्थ, प्लॉट क्रमांक ९६, भाऊ दाजी रोड, किंग्ज सर्कल, माटुंगा पूर्व, मुंबई, रुपेश दत्तराम जाधव (९१६७९१८४४०), मनाली मधुकर  जाधव (९३२०४७४८९३). ‘एफ’ साऊथ, जगन्नाथ भातनकर मार्ग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड जंक्शन, परळ नाका, मुंबई, सिद्धी प्रमाणे बामणे (९९८७३१५९५६), गणेश हनुमंत सूर्यवंशी (९३२३०३६२११). ‘जी’ नॉर्थ, हरिश्चंद्र येलवे मार्ग, प्लाझा सिनेमा मागे, मुंबई, प्रवीण साहेबराव निकाळजे (९८९२०५०६४५), अथर्व जितेंद्र तांडेल (९१३७३४५०९६). ‘जी’ साऊथ, धनमिल नाका, ना. म. जोशी, मार्ग, मुंबई, चैतन्य हेमंत दाभोळकर (८८९८८५२३७३), पूजा विनायक मयेकर (८०८२७६९३९३).

०००००

गोपाळ साळुंखे/स.सं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *