चिंचोली येथील प्रस्तावित ‘मेडिकल हब’ ची मंत्री गिरीश महाजन यांच्यासह अधिकाऱ्यांनी केली पाहणी

 प्रकल्पाच्या कामाला वेग घेण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना

जळगाव दि. 30 ( जिमाका ) तालुक्यातील चिंचोली येथील प्रस्तावित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या इमारतींचे बांधकाम वेगाने सुरु आहे. या प्रकल्पाची शुक्रवारी दि. ३० ऑगस्ट रोजी सकाळी राज्याचे ग्रामविकास, पंचायत राज व पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांच्यासह अधिकाऱ्यांनी पाहणी केली. यावेळी मंत्री गिरीश महाजन यांनी प्रकल्पाच्या कामाला लवकर पूर्ण करण्याच्या विविध विभागांच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.

चिंचोली येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या नवीन इमारतींचे बांधकाम वेगात सुरु आहे. याठिकाणी महाविद्यालय, रुग्णालय, वसतिगृह, अतिथीगृह, प्राध्यापक निवासस्थान, अधिष्ठाता कार्यालय असे विविध प्रकल्प उभारले जात आहे. शुक्रवारी दिनांक 30 ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता मंत्री गिरीश महाजन, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय गायकवाड, प्रशासकीय अधिकारी डॉ. जितेंद्र सुरवाडे यांनी पाहणी केली. यावेळी एचएससीसी कंपनीचे मुख्य व्यवस्थापक  संदीप जैन, विभागीय प्रमुख भीमराव कांबळे, न्याती कन्स्ट्रक्शनचे विभागीय मुख्य अभियंता संदीप गाडेकर, एक्झिक्युटिव्ह अभियंता शरद दवांगे उपस्थित होते.

यावेळी संदीप गाडेकर आणि संदीप जैन यांनी मंत्री महाजन, जिल्हाधिकारी, अधिष्ठाता व अधिकाऱ्यांना प्रकल्पाचे आतापर्यंत झालेले बांधकाम व त्यातील रचना, मांडणी, कामाचा दर्जा याबाबत माहिती दिली. पूर्ण प्रकल्पाला जाऊन अधिकाऱ्यांनी पाहणी केली. बांधकामातील साहित्य, साधनसामुग्रीचा माहिती घेतली. नकाशाद्वारेदेखील बांधकामाची माहिती मंत्री महाजन यांच्यासह अधिकाऱ्यांना देण्यात आली.  यावेळी गिरीश महाजन यांनी समाधान व्यक्त केले. पाणी, रस्ते, वीज, कंपाऊंड वॉलसाठी २० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना तत्काळ सूचित केले.

 प्रकल्प कार्यालयात मंत्री गिरीश महाजन, जिल्हाधिकारी, अधिष्ठाता यांना प्रकल्प अधिकाऱ्यांनी पिपीटीद्वारे माहिती दिली. प्रकल्प कुठवर पूर्णत्वास गेला आहे तसेच पूर्ण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय तसेच निवास व्यवस्था तयार झाल्यावर भविष्यात कसे दिसेल याचे एक प्रतीचलचित्र (व्हिडिओ) दाखवण्यात आले.

प्रकल्पाच्या ठिकाणी कामगारांना स्वतंत्र कॉलनी उभारण्यात आली असून त्यांच्या सर्व सुरक्षेची काळजी घेतली जात असल्याचे प्रकल्प अधिकाऱ्यांनी सांगितले. यावेळी शासकीय विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी यांचेसह अधिष्ठाता कार्यालयातील

बांधकाम विभागाचे साहेबराव कुडमेथे आदी उपस्थित होते.

000000000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *