‘हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त

सातारा दि.  23-हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या 350 व्या शहीदी समागम वर्षानिमित्त 28 फेब्रुवारी ते 1 मार्च 2026 रोजी खारघर नवी मुंबई येथील हिंद दी चादर या महान समागमाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.  या कार्यक्रमाची ऐतिहासिक भव्यता व व्यापकता लक्षात घेऊन क्षेत्रीय स्तरावर सुक्ष्म नियोजनासाठी आरोग्य विभागाकडून जिल्ह्यात आरोग्य विषयक व शिबीर आरोग्य सप्ताहाचे आयोजन करण्यात येत आहे.

यानुसार सातारा जिल्ह्यात हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या 350 व्या शहीदी समागम वर्षानिमित्त उप जिल्हा रुग्णालय कराड व फलटण तसेच महाबळेश्वर, वाई, पाटण, मेढा, सोमर्डी, उंडाळे, वडूज गोंदवले, औंध, कोरेगाव, कलेढोण, पिंपोडा, ढेबेवाडी, खंडाळा व काशिळ येथील ग्रामीण रुग्णालयात मोफत आरोग्य शिबीरांचे आयोजन करण्यात आले आहे.  या शिबीरात सर्व प्रकारची रुग्ण व प्रयोगशाळा तपासणी होणार असून इसीजी तपासणी, कॅन्सर स्क्रीनिंग तपासणी होणार आहे.  तसेच आभा कार्ड, आयुष्यमान कार्ड काढणे,  रोगांवर  औषधोपाचार करण्यात येणार आहे.  या शिबीरास चांगला प्रतिसाद मिळत असून जिल्ह्यातील  नागरिकांनी या शिबीरांचा लाभ घ्यावा, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *