शहीद भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांना मंत्रालयात अभिवादन

मुंबई, दि २३: भारतीय स्वातंत्र्य लढ्यात उल्लेखनीय योगदान देणारे क्रांतिकारक भगतसिंग, राजगुरु, सुखदेव यांना शहीद दिनानिमित्त मंत्रालयात अभिवादन करण्यात आले. सामान्य प्रशासन विभागाचे प्रधान सचिव डॉ. अतुल पाटणे यांनी त्यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे उपसचिव हेमंत महाजन, अवर सचिव रामदास कोळेकर, कक्ष अधिकारी निलेश हरड, सहायक कक्ष अधिकारी राजेंद्र बच्छाव, विजय शिंदे यांनीही पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

०००

प्रविण भुरके/स.सं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *