मुंबई, दि. ७: व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष तो लाम यांचे एक दिवसीय भेटीसाठी आज सकाळी मुंबईत आगमन झाले. या भेटीदरम्यान आयोजित ‘बिझनेस फोरम’ साठी उच्चस्तरीय शिष्टमंडळासह आगमन झाल्यानंतर त्यांचे हॉटेल ट्रायडेंट येथे महाराष्ट्रीय पद्धतीने जल्लोषात स्वागत करण्यात आले.
राजशिष्टाचार आणि सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने आयोजित या समारंभात ढोल, लेझीमसह तुतारीच्या गजरात, शंखनाद करुन आणि टाळ, मृदंगाच्या तालावर पारंपरिक नृत्य करुन राष्ट्राध्यक्ष तो लाम यांचे स्वागत करण्यात आले.
०००
बी.सी.झंवर/विसंअ