राजधानीत महाराणा प्रतापसिंह यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

नवी दिल्ली, २९ : शूर योद्धा, महापराक्रमी महाराणा प्रतापसिंह यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र सदन  व  महाराष्ट्र परिचय केंद्रात त्यांना अभिवादन करण्यात आले.

कॉपर्निकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात  निवासी आयुक्त   तथा सचिव आर. विमला यांनी  महाराणा प्रतापसिंह यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार, श्रीमती स्मिता शेलार यांच्यासह उपस्थित महाराष्ट्र सदनाच्या अधिकारी व  कर्मचाऱ्यांनीही  प्रतिमेस  पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

महाराष्ट्र परिचय केंद्रात महाराणा प्रतापसिंह यांना अभिवादन

महाराष्ट्र परिचय केंद्रात आयोजित कार्यक्रमात महाराणा प्रतापसिंह यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. परिचय केंद्राच्या उपसंचालक अमरज्योत कौर अरोरा यांच्यासह उपस्थित कर्मचाऱ्यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *