मुंबई, दि. १५ : समस्याग्रस्त व पीडित महिलांना त्यांच्या अडचणी मांडण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध व्हावे तसेच त्यांच्या हक्कांचे संरक्षण होऊन न्याय मिळावा, यासाठी महिला व बाल विकास विभागामार्फत जिल्हास्तरावर आयोजित महिला लोकशाही दिनाचे सोमवार, १८ मे २०२६ रोजी आयोजन करण्यात आले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय, मुंबई शहर येथे सकाळी ११.०० ते दुपारी १.०० या वेळीत आयोजित या कार्यक्रमात महिलांच्या तक्रारी, अडचणी व निवेदनांवर शासकीय यंत्रणेमार्फत मार्गदर्शन व सोडवणूक केली जाणार आहे. महिला लोकशाही दिनात तक्रार दाखल करण्यासाठी आवश्यक अर्जाचा नमुना जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, ११७ बी.बी.डी. चाळ, पहिला मजला, वरळी, मुंबई – ४०००१८ येथे उपलब्ध करून देण्यात आला आहे.
तक्रार अर्ज विहित नमुन्यात सादर करणे आवश्यक असून तक्रार अथवा निवेदन वैयक्तिक स्वरूपाचे असावे. न्यायप्रविष्ट प्रकरणे, विहित नमुन्यात नसलेले अथवा आवश्यक कागदपत्रे न जोडलेले अर्ज, सेवा व आस्थापनाविषयक बाबी तसेच वैयक्तिक स्वरूपाचे नसलेले तक्रार अर्ज स्वीकारले जाणार नसल्याचे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, मुंबई शहर यांनी कळविले आहे.
0000
श्रद्धा मेश्राम/विसंअ