नाशिक, दि. १ मे, २०२६ (जिमाका वृत्तसेवा) : महाराष्ट्र राज्याच्या ६७ व्या स्थापना दिनानिमित्त आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. पोलिस दलाच्या तुकडीने मानवंदना दिली.
यावेळी अपर जिल्हाधिकारी हेमांगी पाटील, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी (इगतपुरी/ त्र्यंबकेश्वर) डॉ. पवन दत्ता, उपविभागीय अधिकारी (नाशिक) अर्पिता ठुबे, निवासी उपजिल्हाधिकारी रोहितकुमार राजपूत, उपजिल्हाधिकारी रवींद्र भारदे, महेश जमदाडे, अभिजित नाईक, शुभांगी भारदे, सीमा अहिरे, कुंदन हिरे, नगरपालिका शाखेचे सह आयुक्त शाम गोसावी, तहसीलदार पंकज पवार, अपर तहसीलदार अमोल निकम, तहसलीदार प्रदीप वर्पे (सर्वसाधारण) आदींसह विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. प्रसाद यांनी उपस्थितांना महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. यावेळी पोलीस बॅन्ड पथकाने वंदे मातरम्, राष्ट्रगीत व राज्यगीताची धून वाजविली.
०००००