‘छत्रपती संभाजीनगर : पर्यटन’ या कॉफीटेबल बुकचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते विमोचन

छत्रपती संभाजीनगर, दि.१२ (जिमाका)-जिल्हा माहिती कार्यालयाने तयार केलेल्या ‘छत्रपती संभाजीनग: पर्यटन’ या कॉफी टेबल बुकचे विमोचन पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते करण्यात आले.

जिल्हा नियोजन सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. इमाव, अपारंपारिक उर्जा मंत्री अतुल सावे, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, राज्यसभा सदस्य खासदार डॉ. भागवत कराड, लोकसभा सदस्य खा. संदिपान भुमरे, खा.डॉ. कल्याण काळे, विधान परिषद सदस्य आमदार विक्रम काळे, आ.राजेश राठोड, आ. संजय केणेकर, विधानसभा सदस्य आ. प्रदीप जयस्वाल, आ. प्रशांत बंब, आ. अनुराधा चव्हाण, आ. संजना जाधव, आ. विलास भुमरे तसेच जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, पोलीस आयुक्त प्रविण पवार, पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, जिल्हा नियोजन अधिकारी भारत वायाळ तसेच सर्व विभागांचे विभागप्रमुख उपस्थित होते.

जिल्ह्यातील पर्यटन स्थळांची माहिती, तसेच कला, संस्कृती, खाद्यसंस्कृती अशा विविध वैशिष्ट्यांची माहिती या पुस्तकात देण्यात आली आहे.

०००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *