प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे मुंबईत आगमन

मुंबई, दि. २९: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे दुपारी ३.४५ वा. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई येथे आगमन झाले.

प्रधानमंत्री यांचे राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री तथा मुंबई उपनगर पालकमंत्री ॲड.आशिष शेलार, खासदार प्रफुल पटेल, खासदार सुनील तटकरे, आमदार रवींद्र चव्हाण, आमदार अमित साटम, आमदार कुमार आईलानी, आमदार सुलभा गायकवाड, आमदार हिरामण खोसकर, आमदार ज्ञानेश्वर कटके इ मान्यवर उपस्थित होते.

Milind Kadam M4B

यावेळी मुख्य सचिव राजेश कुमार, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती, इत्यादी मान्यवरही उपस्थित होते. तसेच राजशिष्टाचार विभाग व पोलीस दलाचे वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते.

000

संदीप अंबेकर/स.सं

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *