धोत्रे येथे २२० के.व्ही. उपकेंद्राच्या कामाला गती द्यावी – ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर

मुंबई, दि. १२ : मौजे धोत्रे, ता. पारनेर, जि. अहिल्यानगर येथे प्रस्तावित २२० के.व्ही. उपकेंद्राचे लवकरात लवकर प्रत्यक्ष काम सुरू करण्यात यावे, अशा सूचना ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी दिल्या.

एमएसआरडीसी निर्मलभवन येथे मौजे धोत्रे येथील २२० के.व्ही. उपकेंद्र तसेच मौजे वनकुटे, ता. पारनेर, जि. अहिल्यानगर येथे नवीन उपकेंद्र उभारणीसंदर्भात आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी आमदार काशिनाथ दाते, महापारेषणचे संचालक सतीश चव्हाण, कार्यकारी संचालक धनंजय औटेकर, कार्यकारी अभियंता योगेश चव्हाण यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत आमदार दाते यांनी मतदारसंघातील ऊर्जा विभागाशी संबंधित विविध समस्या मांडल्या. त्यावर राज्यमंत्री साकोरे-बोर्डीकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने दखल घेऊन प्रलंबित प्रश्न सोडविण्याच्या सूचना दिल्या. तसेच ऊर्जा विभागाची सुरू असलेली कामे जलद गतीने पूर्ण करण्यासाठी संबंधित कंत्राटदारांना आवश्यक निर्देश देण्याचेही श्रीमती साकोरे-बोर्डीकर यांनी सांगितले.

0000

राजू धोत्रे/विसंअ

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *