विधानपरिषदेच्या नवनिर्वाचित दहा सदस्यांचा १४ मे रोजी शपथविधी

मुंबई, दि. १२ : महाराष्ट्र विधानपरिषदेवर विधानसभा सदस्यांद्वारे व्दिवार्षिक निवडणूकीत बिनविरोध निवडून आलेले नऊ सदस्य आणि पोटनिवडणुकीत विजयी झालेल्या एक सदस्या अशा दहा नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी गुरुवार, 14 मे, 2026 रोजी सकाळी 11.00 वाजता मध्यवर्ती सभागृह, विधान भवन, मुंबई येथे होणार आहे. महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे हे या दहा सदस्यांना सदस्यत्वाची शपथ देतील.

1) डॉ. नीलम गोऱ्हे
2) ओमप्रकाश ऊर्फ बच्चू बाबाराव कडू
3) अंबादास एकनाथराव दानवे
4) डॉ. प्रज्ञा राजीव सातव
5) प्रमोद शांताराम जठार
6) झीशान झिआउद्दीन सिध्दीकी
7) माधवी संजय नाईक
8) सुनिल विनायक कर्जतकर
9) विवेक बिपिनदादा कोल्हे
10) संजय नथ्थुजी भेंडे

या नवनिर्वाचित सदस्यांना सभापती शपथ देतील. या शपथविधी समारंभास विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर,  मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, विधानसभेचे उपाध्यक्ष. अण्णा बनसोडे, संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांना निमंत्रित करण्यात आले असून या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती असेल. विधानपरिषदेच्या सदस्यांनाही शपथविधी समारंभासाठी निमंत्रित करण्यात आले आहे. विधानपरिषदेच्या विद्यमान उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे सलग पाचव्यांदा सदस्यत्वाची शपथ घेतील.

0000

ज.सं.अ/विधानमंडळ

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *