तख्त सचखंड श्री हजूर साहिब गुरुद्वारात केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांनी घेतले दर्शन

 

नांदेड, दि. २८ : केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री चिराग पासवान यांनी नांदेड येथील दौऱ्यात सुप्रसिद्ध श्री हजूर साहिब सचखंड गुरुद्वारास भेट देऊन दर्शन घेतले. यावेळी गुरुद्वाराचे पुजारी यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला. त्यांच्यासोबत त्यांचे कुटुंबीय यांची उपस्थिती होती.

यावेळी उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, तहसिलदार संजय वारकड, जिल्हा कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत आदी उपस्थित होते. यावेळी केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांनी तख्त सचखंड श्री हजूर साहिब गुरुद्वारात लंगर प्रसाद घेऊन सेवा केली.

00000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *