कॅनडाचे प्रधानमंत्री व त्यांचे शिष्टमंडळ यांचे मुंबईहून प्रयाण

मुंबई, दि. १ : कॅनडाचे प्रधानमंत्री मार्क कार्नी त्यांची पत्नी डायना फॉक्स कार्नी व त्यांचे शिष्टमंडळ यांचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई येथून विमानाने दुपारी ४.४० वाजता प्रयाण झाले.

VIRENDRA_DHURI

राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी हस्तांदोलन करून त्यांचे स्वागत केले. यावेळी मुख्य सचिव राजेश अग्रवाल, मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती, सचिव तथा मुख्य राजशिष्टाचार अधिकारी डॉ. राजेश गवांदे, मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी, सौरभ कटियार आदी मान्यवर उपस्थित होते.

कॅनडाचे प्रधानमंत्री मार्क कार्नी त्यांची पत्नी डायना फॉक्स कार्नी यांनी शिष्टमंडळासमवेत दिल्ली येथे प्रयाण केले.

०००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *