मुंबई, दि. 29 :- “आयसीसी टी-ट्वेंटी विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाचे कौतुक करायला शब्द अपुरे आहेत. तब्बल सतरा वर्षांनंतर भारतीय क्रिकेट संघाने टी-ट्वेंटी वर्ल्डकप जिंकून देशवासियांना दिलेला आनंद अवर्णनीय आहे. संपूर्ण देश या विजयाने भारावून गेला आहे. कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने केलेली कामगिरी जगज्जेत्यासारखीच आहे. विराट कोहली, अक्षर पटेल, शिवम दुबे यांनी दमदार पण संयमी खेळी करुन सर्वाधिक धावांचा विक्रम रचला. सूर्यकुमार यादवचा झेल, जसप्रीत बुमराहची गोलंदाजी हे सारंच अविस्मरणीय होतं. संघातल्या प्रत्येक खेळाडूचं योगदान, समस्त देशवासियांच्या शुभेच्छांमुळेच हे यश मिळालं आहे. भारतीय क्रिकेट संघाचं हे यश देशातील क्रिकेटसह देशातील अन्य खेळांना संजीवनी तसेच खेळाडूंना प्रेरणा देईल. आयसीसी टी-ट्वेंटी विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचे मी मनापासून अभिनंदन करतो,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनी विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघाचे अभिनंदन केले आहे.
Related Posts
लातूर जिल्हा रुग्णालय उभारणीसाठी पुरवणी मागण्यांमध्ये ३ कोटी ३२ लाख रुपयांच्या निधीला मंजूरी
मुंबई, दि. १०: पालकमंत्री शिवेंद्रसिंह भोसले यांच्या अथक प्रयत्नामुळे लातूरच्या जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या उभारणीस मिळणार असून या रुग्णालयाच्या जागेसाठी आवश्यक…
‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारताची गुढी उंचच उंच जात राहो’ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नागपूर, दि.१९ : ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारताची गुढी उंचच उंच जात राहो,’अशा शुभेच्छा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी…
राजधानीत महाराष्ट्राची सर्वांगीण प्रतिमा जोपासण्याचे उल्लेखनीय कार्य महाराष्ट्र परिचय केंद्राचे : निवासी आयुक्त आर. विमला
नवी दिल्ली, दि. 11: राजधानी मध्ये महाराष्ट्राची सर्वांगीण प्रतिमा जोपासण्याचे महत्त्वाचे कार्य गेली 65 वर्ष महाराष्ट्र परिचय केंद्राच्या माध्यमातून होत आहॆ. या…