आदिवासी कुटुंबाच्या परसबागेसाठी चाळीस लाख रुपयांच्या निधीस मान्यता

मुंबई दि. २६ : राज्यातील आदिवासी जिल्ह्यांमध्ये आदिवासी कुटुंबाच्या परसबागेत फळझाडे व भाजीपाला लागवडीची योजना सन २०२४-२५ मध्ये राबविण्यासाठी 40 लाख रुपये एवढ्या निधीस प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे, याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.

राज्यातील ठाणे, पालघर ,पुणे, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, नांदेड, यवतमाळ, गडचिरोली, चंद्रपूर ,अमरावती व गोंदिया या १४ जिल्ह्यातील आदिवासी कुटुंबाच्या परसबागेत फळझाडे व भाजीपाला लागवडीची योजना सन २०२४-२५ मध्ये राबविण्यासाठी अर्थसंकल्पित केलेल्या 40 लाख रुपये एवढ्या निधीच्या कार्यक्रमाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.

आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत राज्यातील १४ जिल्ह्यातील आदिवासी भागातील कुपोषणाचे प्रमाण कमी करण्याच्या उद्देशाने व आदिवासी बांधवांना पौष्टिक आहार पुरवण्यासाठी, आदिवासी कुटुंबाच्या परसबागेत पौष्टिक भाजीपाला व फळांची निवड करून त्याची लागवड करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी “आदिवासी कुटुंबाच्या परसबागेत फळझाडे व भाजीपाला लागवड” ही योजना राज्यात राबविण्यात येते.

०००

दत्तात्रय कोकरे/विसंअ/

202407261110372201

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *