साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई, दि. १९: साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ, मुंबई शहर-उपनगर जिल्ह्यात ‘साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे शिष्यवृत्ती’ योजनेकरिता २४ जुलै २०२४ पर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन वैशाली मुडळे, जिल्हा व्यवस्थापक, मुंबई शहर-उपनगर यांनी केले आहे.

मुंबई शहर,उपनगर जिल्ह्यातील मातंग समाज व तत्सम १२ पोटजातीतील विद्यार्थ्यांनी सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात शिक्षण घेतलेल्या व  उत्तीर्ण झालेल्या इयत्ता १० वी, १२ वी, पदवी, पदव्युत्तर, वैद्यकीय व अभियांत्रिकी इ. करिता महामंडळाकडून सरासरी ६० टक्के पेक्षा जास्त गुण असलेल्या विद्यार्थ्यांकडून ‘साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे शिष्यवृत्ती’ योजनेकरिता अर्ज मागविण्यात येत आहेत.

ज्येष्ठता व गुणानुक्रमांकानुसार प्रथम ३ ते ५ विद्यार्थ्यांची निधीच्या उपलब्धतेनुसार शिष्यवृत्ती वितरित करण्यात येणार आहे. अभ्यासक्रमामध्ये विशेष प्रावीण्याने गुणवत्ता मिळवून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी जातीचा दाखला, शिधापत्रिका, आधार कार्ड, शाळेचा दाखला, गुणपत्रक, दोन फोटो, पुढील वर्गात प्रवेश घेतल्याचा पुरावा इ.सह दोन प्रतींमध्ये आपले अर्ज पूर्ण पत्ता व भ्रमणध्वनी क्रमांकासह साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे, विकास महामंडळ (मर्या), मुंबई- गृहनिर्माण भवन, कलानगर, तळमजला, रुम नं. ३३, बांद्रा (पू), मुंबई-४०००५१ या पत्त्यावर २४ जुलै, २०२४ पर्यंत करावेत, असे प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.

०००

शैलजा पाटील/ वि.स.अ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *