मुंबई, दि. 14 : महाराष्ट्र शासनाचा कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभाग युवकांना आंतरराष्ट्रीय स्तरावरही रोजगार मिळवून देण्यासाठी अग्रेसर आहे. युवकांनी विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन आपले आणि देशाचे भवितव्य उज्ज्वल घडवावे, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजक्ता आयुक्तालयाच्या आयुक्त निधी चौधरी यांनी ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात केले आहे.
15 जुलै या ‘जागतिक युवा कौशल्य दिनाच्या’ पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाचा कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभाग तसेच महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना व उपक्रम, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना, स्टार्टअप वीक, प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना, आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र योजना, शॉर्ट टर्म्स स्किलिंग, ‘आयटीआय’ मार्फत इंडस्ट्री सोबत सामंजस्य करार, अप्रेंटिस योजना, तसेच रोजगार मेळावे यासंदर्भात सविस्तर माहिती श्रीमती. चौधरी यांनी ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून माहिती दिली आहे.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून ही मुलाखत, सोमवार दि. 15, मंगळवार दि. 16 आणि बुधवार दि. 17 जुलै 2024 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲप वर प्रसारित होणार आहे. तर ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ही मुलाखत मंगळवार दि. 16 जुलै, 2024 रोजी सायंकाळी 7.30 वाजता महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर पाहता येणार आहे. निवेदिका सुषमा जाधव यांनी ही मुलाखत घेतली आहे.
एक्स-https://twitter.com/mahaDGIPR
फेसबुक-https://www.facebook.com/mahaDGIPR
युट्युब-https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR
0000000