माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त विधानभवनात अभिवादन

मुंबई, दि. 1 : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि हरित-धवल क्रांतीचे प्रणेते दिवंगत वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त आज विधानभवन परिसरातील त्यांच्या पुतळ्यास महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. श्रीमती नीलम गोऱ्हे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी महाराष्ट्र विधानपरिषदेचे सदस्य राजेश राठोड, अमोल मिटकरी, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे सचिव (2) (कार्यभार) विलास आठवले यांच्यासह अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही स्व. वसंतराव नाईक यांच्या पुतळ्यास गुलाबपुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *