मुंबई, दि. 29 :- “आयसीसी टी-ट्वेंटी विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाचे कौतुक करायला शब्द अपुरे आहेत. तब्बल सतरा वर्षांनंतर भारतीय क्रिकेट संघाने टी-ट्वेंटी वर्ल्डकप जिंकून देशवासियांना दिलेला आनंद अवर्णनीय आहे. संपूर्ण देश या विजयाने भारावून गेला आहे. कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने केलेली कामगिरी जगज्जेत्यासारखीच आहे. विराट कोहली, अक्षर पटेल, शिवम दुबे यांनी दमदार पण संयमी खेळी करुन सर्वाधिक धावांचा विक्रम रचला. सूर्यकुमार यादवचा झेल, जसप्रीत बुमराहची गोलंदाजी हे सारंच अविस्मरणीय होतं. संघातल्या प्रत्येक खेळाडूचं योगदान, समस्त देशवासियांच्या शुभेच्छांमुळेच हे यश मिळालं आहे. भारतीय क्रिकेट संघाचं हे यश देशातील क्रिकेटसह देशातील अन्य खेळांना संजीवनी तसेच खेळाडूंना प्रेरणा देईल. आयसीसी टी-ट्वेंटी विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचे मी मनापासून अभिनंदन करतो,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनी विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघाचे अभिनंदन केले आहे.
Related Posts
प्रत्येक तालुक्यात संविधान भवन उभारणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
हजारोंच्या उपस्थितीत ‘मुख्यमंत्री कृतज्ञता सोहळा’ साजरा; सर्वांच्या हिताचा ‘डीपी प्लॅन’ करण्याची मुख्यमंत्र्यांनी दिली ग्वाही छत्रपती संभाजीनगर दि. ११ : येत्या…
धारावीचा पुनर्विकास हे आमचं सामाजिक वचन – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई, दि. २९ : मुंबई महानगरात येणाऱ्या काळात धारावी हे सर्वात सुनियोजित पुनर्वसित शहर म्हणून नावारूपाला येईल. आशियातली सर्वात मोठी…
पीपल्स एज्युकेशन सोसायटी अंतर्गत संस्थांच्या जतन, संवर्धनाची कामे त्वरीत करावीत – सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट
मुंबई, दि. ५ : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शैक्षणिक कार्याला अभिवादन म्हणून द पीपल्स एज्युकेशन सोसायटीअंतर्गत शैक्षणिक संस्था व वसतिगृहांच्या जीर्णोद्धार, जतन…