मुंबई दि.२७ : – महावितरणने महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या (MERC) मान्यतेनंतर ऊर्जा मंत्रालय (MoP), भारत सरकारच्या (GoI) सुधारित वितरण क्षेत्र योजनेमध्ये (RDSS) वाहिन्यांचे विलगीकरण, वितरण हानी कमी करणे, वितरण प्रणालीचे सक्षमीकरण आणि स्मार्ट मीटरिंग (Smart Metering) यांसारखे कार्यक्रम हाती घेतले आहेत. यामुळे महाराष्ट्रातील ग्राहकांना विश्वासार्ह आणि दर्जेदार वीजपुरवठा होण्यास मदत होईल. या योजनेद्वारे सिस्टीम मीटरिंग अंतर्गत सबस्टेशनमधील सर्व फीडरवर तसेच वितरण रोहित्रांवर (Distribution Transformer) आणि सर्व सरकारी कार्यालयांमध्ये स्मार्ट मीटर बसविण्यात येत आहेत. सर्वसामान्य ग्राहकांना मात्र प्रीपेड स्मार्ट मीटर बसविण्यात येत नाहीत असे महावितरणने कळविले आहे.
Related Posts
लातूरच्या पथदर्शी कामाचा इतर जिल्ह्यांनी आदर्श घ्यावा – विभागीय आयुक्त श्री. मधुकर राजे अर्दड
छत्रपती संभाजीनगर,दि. 5 (विमाका) :- लातूर जिल्हयाने टीमवर्कच्या माध्यमातून विविध क्षेत्रात चांगले काम केले आहे. मराठवाडयातील इतर जिल्हयांनीही लातूरच्या पथदर्शी…
सावधान….भारतीय लोकशाहीत पेड न्यूजला थारा नाही…!
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 ची रणधुमाळी सुरू झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर भारतीय निवडणूक आयोगाने दि.16 मार्च 2024 “आदर्श आचार संहिता”…
सायबर कॉमिक बुकचे पालकमंत्री शंभुराज देसाई यांच्या हस्ते अनावरण
सातारा दि. 7 (जिमाका): सध्या मोबाईल, संगणक, ऑनलाईन बँकिंग, सोशल नेटवर्किंग साईट, इत्यादी गोष्टींचा वापर युवा पिढीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढलेला असून…