७५ टक्क्‍यापेक्षा जास्‍त मतदान टक्केवारी साध्‍य करणाऱ्या केंद्राचा होणार सन्‍मान

नांदेड, दि. 21  एप्रिल :- लोकसभा निवडणुकीच्‍या अनुषंगाने नांदेड जिल्‍ह्यात स्‍वीप अंतर्गत मतदार जागृतीचे विविध उपक्रम सुरु आहेत. या उपक्रमाच्‍या अनुषंगाने सर्वोकृष्‍ट कामगिरी व उत्‍कृष्‍ट मतदान टक्‍केवारी करणा-या  गावांचा, वार्डचा त्‍याचप्रमाणे मतदानासाठी नियुक्‍त सर्वस्‍तरीय अधिकारी व कर्मचारी यांचा सन्मान करण्‍यात येणार आहे.

नांदेड जिल्‍ह्यात प्रत्‍येक विधानसभा मतदार संघातील सर्वोकृष्‍ट मतदान टक्‍केवारी असलेल्‍या तीन मतदान केंद्राचा सन्‍मान जिल्‍हास्‍तरावर करण्‍यात येणार आहे. यामध्‍ये बिलओ, मतदान कर्मचारी, मतदान केंद्रावरील पोलीस कर्मचारी , झोनल अधिकारी, झोनल पोलीस अधिकारी, बिलओ सुपरवायझर, त्‍या गावातील अथवा वार्डमधील गावस्‍तरीय व वार्डस्‍तरीय अधिकारी यांचा सन्‍मान करण्‍यात येणार आहे.

तसेच सर्वोकृष्‍ट कामगिरी करणारे मतदान केंद्र ज्‍या ठिकाणी स्थित आहे. त्‍या गावाच्‍या ग्रामसभेचा, वार्डच्‍या वार्ड सभेचा सन्‍मान करण्‍यात येणार आहे. तसेच 75 टक्‍के पेक्षा जास्‍त मतदान टक्‍केवारी साध्‍य करणा-या मतदान केंद्राचा प्रोत्‍साहनपर सत्‍कार करण्‍यात येईल. त्‍यामध्‍ये  तेथील बीएलओ, मतदान कर्मचारी, पोलीस कर्मचारी , झोनल  अधिकारी, झोनल पोलीस अधिकारी, बीएलओ पर्यवेक्षक तसेच स्‍थानिक ग्रामसभा,वार्डसभा यांचा सन्‍मान करण्‍यात येणार आहे. तसेच जिल्‍ह्यातील सर्वोकृष्‍ट मतदान टक्‍केवारी साध्‍य करणा-या तीन मतदान केंद्राचा विशेष पारितोषिक देवून सन्‍मान करण्‍यात येणार आहे, या संदर्भातील एक पत्र जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, यांनी सर्व कर्मचाऱ्यांसाठी जारी केले आहे.

०००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *