विधानसभा कामकाज

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विधानभवनात विशेष कार्यक्रमाचे आयोजन – विधानसभा तालिका अध्यक्ष योगेश सागर

मुंबई, दि. २६ : दरवर्षी २७ फेब्रुवारी हा दिवस राज्यात ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून उत्साहात साजरा केला जातो. त्याच औचित्याने अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान ‘जावे विनोदाच्या गावा’ हा कार्यक्रम २७ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १० ते ११.४५ या वेळेत विधानभवनात होणार आहे, अशी माहिती विधानसभेचे तालिका अध्यक्ष योगेश सागर यांनी सभागृहाला दिली.

या कार्यक्रमास पीठासीन अधिकारी, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सांस्कृतिक कार्य मंत्री, मराठी भाषा मंत्री, मराठी भाषा समितीचे प्रमुख, मंत्री व राज्यमंत्री, दोन्ही सभागृहांचे सदस्य तसेच पत्रकारांनी उपस्थित राहावे, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी वि.स.पागे संसदीय प्रशिक्षण केंद्रातर्फे संपादित ‘लोक सेवेचा लोकजागर’ या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

०००००

मोहिनी राणे, सं. स.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *