मुंबई, दि. 21 :- “रेडिओच्या आवाजाचा अनभिषिक्त सम्राट, ज्येष्ठ निवेदक अमिन सयानी यांच्या निधनाने भारतीय रेडिओच्या सांगीतिक इतिहासातील सोनेरी अध्याय संपला आहे. रेडिओ हेच माहिती व मनोरंजनाचे एकमेव साधन होते त्या काळात अमिन सयानी यांनी १९५२ ते १९९४ अशी तब्बल बेचाळीस वर्षे रेडिओवर गीतमाला सादर केली. त्यांच्या शैलीदार, रसाळ निवेदनाने रेडिओवरील गीतांची गोडी कैकपटीने वाढवली. संगीत रसिकांच्या कितीतरी पिढ्यांचे कान त्यांच्या निवेदनानं तृप्त केले. त्यांनी रेडिओवर घेतलेल्या गायक, गीतकार संगीतकारांच्या मुलाखती हा भारताच्या सांगीतिक वाटचालीचा अमूल्य ठेवा आहे. त्यांच्यासारखा निवेदक भारतीय रेडिओवर असणं आणि त्याचा आवाज ऐकायला मिळणं, हा अवर्णनीय आनंद होता. त्यांचं निधन ही भारतीय कला, सांस्कृतिक क्षेत्राची कधीही भरुन न निघणारी हानी आहे. मी अमिन सयानी साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.” अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ज्येष्ठ निवेदक अमिन सयानी यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करुन आपल्या शोकभावना व्यक्त केल्या.
Related Posts
राज्यपाल रमेश बैस यांनी घेतली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची सदिच्छा भेट
नवी दिल्ली ,दि. १९ : महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांनी आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची त्यांच्या लोकजन कल्याण मार्ग स्थित…
क्षेत्रिय अधिकाऱ्यांनी मतदान केंद्रावर मतदानाची प्रक्रिया पार पाडण्यासाठी आदेश, सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे – जिल्हाधिकारी संजय यादव
मुंबई, दि. १८ : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी मुंबई शहर जिल्ह्यात २० नोव्हेंबर रोजी मतदान…
राज्यात सव्वा दोन वर्षांत ३.१४ लाख कोटी रुपयांची विक्रमी परकीय गुंतवणूक -उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
परकीय गुंतवणुकीत या तिमाहीतही राज्य अव्वल देशातील एकूण गुंतवणुकीपैकी तब्बल ५२.४६ टक्के गुंतवणूक महाराष्ट्रात मुंबई, दि. ६ : देशातील एकूण…