पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी वाहिली उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली

सातारा दि. 28 : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान दुर्घटनेत निधन झाले. यावर विश्वास बसत नसून ही घटना मनाला धक्का देणारी आहे, अशा भावना व्यक्त करुन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली वाहिली.
स्पष्टवक्ता, नियमात बसणाऱ्या गोष्टी करणारा नेता म्हणून उपमुख्यमंत्री श्री. पवार यांची संपूर्ण महाराष्ट्राला ओळख होती. मी अडीच वर्ष वित्त विभागाचा राज्यमंत्री असताना त्यांच्या सोबत अनेक बैठका होत होत्या. अर्थसंकल्प सादर करताना त्यांनी महाराष्ट्रातील सर्व घटकांना न्याय देता आला पाहिजे ही त्यांची भूमिका राहील आहे.
शंभूराज देसाई म्हणाले, माझी व उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राजकरणापलीकडची मैत्री होती. त्यांच्या जाण्याने अत्यंत दुख झाले असून पाटण विधानसभा मतदार संघाचा आमदार व सातारा जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून श्री. देसाई यांनी श्रद्धांजली वाहिली.
0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *