मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रामटेकच्या गड मंदिरात घेतले प्रभू श्रीरामांचे दर्शन

नागपूर, दि. ११:  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथील गड मंदिराला भेट दिली व प्रभू श्रीरामांचे दर्शन घेतले. गड मंदिराच्या विकासासाठी राज्य शासनाच्या वतीने आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

 

गोंदिया आणि नागपूर दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्र्यांनी आज पूजा केली. त्यांनतर त्यांनी मंदिर परिसराची पाहणी केली. यावेळी मंदिर समितीच्या वतीने मंदिराविषयीची माहिती त्यांना देण्यात आली. गड मंदिराच्या विकास कामांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. आवश्यक तो निधी उपलब्ध करून देण्यात येईल. स्थानिक लोकप्रतिनिधींनीही यासाठी पाठपुरावा करावा, असे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

यावेळी खासदार कृपाल तुमाने,आमदार ॲड.आशिष जयस्वाल, माजी मंत्री डॉ. दीपक सावंत आदी उपस्थित होते. रामटेक येथे प्रभू श्रीरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या टेकडीवर श्रीराम मंदिर उभारण्यात आले असून गडमंदिर अशी मंदिराची ओळख आहे.

०००

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *