मार्कंडा देवस्थान जिर्णोद्धाराच्या कामाला गती द्या – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

गडचिरोली,(जिमाका)दि.04: मार्कंडा देवस्थान जिर्णोद्धाराच्या कामाला गती देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुरातत्व विभागाला दिले.

मार्कंडा देवस्थानच्या विकासाकरिता एमएमआरडीसीच्या माध्यमातून मंजूर 100 कोटी रुपये व पुरातत्त्व विभागाच्या पाच कोटी रुपयांच्या प्रलंबित विकास कामांचा आढावा उपमुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी आज घेतला. त्याप्रसंगी ते बोलत होते.

महाशिवरात्रीला  प्रथा परंपरेनुसार मंदिर परिसरात प्रसाद वितरणाला रोक न लावण्याच्या सूचनाही श्री फडणवीस यांनी केल्या.

तत्पुर्वी देवस्थानाची पाहणी करुन येथील हेमाडपंथी शिल्पकृतीबाबतची विशेषता व माहिती त्यांनी जाणून घेतली.

खासदार अशोक नेते, आमदार देवराव होळी, आमदार कृष्णा गजबे, विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील, जिल्हाधिकारी संजय मीणा, जिल्हा पोलिस अधीक्षक श्री निलोत्पल, मार्कंडा देवस्थानचे अध्यक्ष गजानन भांडेकर, सचिव मृत्यूंजय गायकवाड, भारतीय पुरातत्व विभागाचे अधीक्षक अरुण मलिक, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता नीता ठाकरे यावेळी  उपस्थित होते.

000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *