भारतरत्न पुरस्काराबद्दल ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले अभिनंदन

मुंबई, दि. ३ :- उत्कृष्ट संसदपटू, समाजकारणातील समर्पित नेतृत्व असणारे, ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना ‘भारतरत्न’ हा देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या अभिनंदनपर संदेशात म्हणतात की, भारताचे माजी उपप्रधानमंत्री, गृहमंत्री म्हणून श्री. लालकृष्ण अडवाणी यांचे कार्य महत्त्वपूर्ण आहे. देशाच्या हिताच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या मुद्द्यांवर त्यांनी संसदेत बेधडक आणि ठामपणे आपली मते मांडली. देशाच्या सर्वसमावेशक विकासासाठी त्यांचे मोलाचे योगदान आहे. भारतरत्न पुरस्काराबद्दल श्री. अडवाणी यांचे पुन्हा एकदा अभिनंदन करतो, असेही त्यांनी म्हटले आहे.

००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *