विकासाकरिता शासकीय योजनांचा नागरिकांनी लाभ घ्यावा – मंत्री छगन भुजबळ

नाशिक, दि. 2 : सर्वसामान्यांच्या विकासासाठी अनेक योजना शासनामार्फत नागरिकांसाठी राबविल्या जातात. या योजनांची माहिती करुन घेऊन त्याचा नगारिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करीत दर्जात्मक विकासकामांसह ती जलद गतीने पूर्ण करण्याचे निर्देश राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले.

आज निफाड तालुक्यातील ब्राम्हणगाव वनस, सारोळे खु. येथील विविध विकास कामांचे भूमिपूजन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी प्रांताधिकारी हेमांगी पाटील, तहसीलदार शरद घोरपडे, गटविकास अधिकारी महेश पाटील, उपविभागीय अभियंता गणेश चौधरी, लासलगाव बाजार समितीचे सभापती बाळासाहेब क्षीरसागर, माजी जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर जगताप, ॲड.अनुप वनसे, सरपंच दत्तुपंत डुकरे, सरपंच प्रमिला चौधरी, सहाय्यक पोलीस निरिक्षक भास्कर शिंदे, ब्राम्हणगाव वनस चे सरपंच विनायक चौधरी यांच्यासह अधिकारी व नागरिक उपस्थित होते.

मंत्री छगन भुजबळ यावेळी म्हणाले, शासनाच्या अनेक योजना गावातील तळागाळातील घटकांपर्यंत पोहोचविण्यासाठी तरूणांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे. त्यांनी शासनाच्या योजनांची माहिती घेवून त्याचा लाभ सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचविला पाहिजे. यासाठी  नागरिकांचा सहभाग व पाठपुरावा तितकाच महत्वाचा आहे. तरुणांसह शेतकरी, महिला यासह समाजातील प्रत्येक घटकाचा विकास करण्यासाठी नेहमीच प्राधान्य देण्यात येत आहे. निधीच्या उपलब्धेतुसार प्राधान्यक्रमानुसार विकासकामे केली जाणार आहेत. यात ब्राम्हणगाव वनस व वनसगाव येथील शाळांची दुरुस्ती तसेच बुद्धविहाराचे कामही लवकरच करण्यात येईल. त्याचप्रमाणे दळणवळणाच्या दृष्टीने मोठा पूल होणे गरजेचे होते. पुलाचे कामही वर्षभरात पूर्ण करण्यात येणार आहे. लासलगाव परिसर व येवलातील एकही गाव विकासापासून वंचित राहणार नाही, यादृष्टीने नियोजनातून प्रत्येक गावात आवश्यक ती विकास कामे करण्यात आली आहे. या विकास कामांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. पुणेगाव दरसवाडी डोंगरगाव पोहोच कालव्याच्या अस्तरीकरणाचे काम जूनपर्यंत पूर्ण होऊन येणाऱ्या पावसाळ्यात गावांमध्ये पाणी पोहचेल. अवकाळीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून मिळालेली मदत तातडीने खात्यावर वर्ग करण्यात यावी, अशा सूचना मंत्री छगन भुजबळ यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना  यावेळी दिले.

या विकास कामांचे मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते झाले भूमिपूजन

ब्राम्हणगाव वनस

1) ब्राम्‍हणगांव वनस ते वनसगांव प्रजिमा १७५ किमी १२/४०० येथे मोठ्या पुलाचे बांधकाम करणे ता. निफाड कामाचे भूमिपूजन (र.रु.३८२.९८ लक्ष)

2) मुलभूत सुविधा अंतर्गत स्‍मशानभुमी शेडचे बांधकाम करणे कामाचे भूमिपूजन (र.रु. १५ लक्ष)

सारोळे खु.

1) मुलभूत सुविधा अंतर्गत जेष्‍ठ नागरीकांसाठी विरंगुळा केंद्र इमारत/सभामंडपाचे बांधकाम करणे कामाचे भूमिपूजन (र.रु. २० लक्ष)

2) सामाजिक न्‍याय विभाग अंतर्गत बौद्ध विहाराचे बांधकाम करणे कामाचे भूमिपूजन (र.रु १५ लक्ष)

3) सारोळे खु. ते जोपूळ बोर्डर रस्‍ता ग्रामा १०३ विनीता नदी पुलापासून किमी ०/०० ते २/०० सुरेश वन्‍से यांच्‍या वस्‍ती पर्यंत रस्‍ता कॉक्रिटीकरण करणे कामाचे कामाचे भूमिपूजन (र.रु. १०० लक्ष)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *