मुंबई, दि. ३० : अभिनय हे सर्वस्व मानत करोडो रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारे ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ हे साक्षात अभिनय सम्राट आहेत, त्यांची महाराष्ट्र भूषण पुरस्कारासाठी निवड होणे हे महाराष्ट्रासाठी भूषणावह असल्याची प्रतिक्रिया महसूल, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
कला क्षेत्रातील भरीव योगदानासाठी ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना शासनाच्यावतीने देण्यात येणारा प्रतिष्ठेचा ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल मंत्री श्री. विखे पाटील यांनी त्यांचे अभिनंदन केले.
००००
एकनाथ पोवार/विसंअ/