मुंबई, दि. २९ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास‘ कार्यक्रमात ‘मराठी भाषा पंधरवड्यानिमित्त‘ मराठी भाषेच्या जतन व संवर्धनासाठी अभिजात मराठी पुस्तक परिचयाची विशेष व्याख्यानमालिका प्रसारित होणार आहे. ही विशेष व्याख्यानमाला २४ ते ३० जानेवारी २०२४ या कालावधीत सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर‘ या मोबाईल ॲपवर प्रसारित होणार आहे.
मराठी भाषेच्या जतन व संवर्धनासाठी शासनस्तरावर सातत्याने प्रयत्न सुरु आहेत. दरवर्षी मराठी भाषा विभागाच्या भाषा संचालनालयामार्फत १४ ते २८ जानेवारी या कालावधीत मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचे आयोजन केले जाते. या पंधरवड्यामध्ये मराठी भाषेतील साहित्य, संस्कृती आणि इतिहास भावी पिढीला कळावे, यासाठी विविध उपक्रम व कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये माहिती व जनसंपर्क महासंचालनालय व भाषा संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने ‘दिलखुलास‘ कार्यक्रमातून अभिजात मराठी पुस्तकांचा परिचय करून देणारी विशेष व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे.
‘दिलखुलास’ कार्यक्रमात होणारे व्याख्यानमालेचे प्रसारण पुढील प्रमाणे :
मंगळवार 30 जानेवारी 2024 रोजी कवी ‘बा. सी. मर्ढेकरांच्या कविता’ या विषयावर लेखक/ समीक्षक डॉ. सुधीर रसाळ माहिती देतील.
बुधवार 31 जानेवारी 2024 रोजी ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त साहित्यिक प्रा.डॉ. भालचंद्र नेमाडे यांच्या ‘हिंदू : जगण्याची समृद्ध अडगळ’ या कादंबरीवर काव्य समीक्षक डॉ.रणधीर शिंदे यांचे विवेचन.
गुरुवार 1 फेब्रुवारी 2024 रोजी साहित्यिक नरहर कुरुंदकर यांच्या ‘जागर’ या वैचारिक लेखांच्या संग्रहावर लेखक विनोद शिरसाठ विवेचन सादर करतील.
०००